July 15, 2011

आठवण करशील तर

आठवण करशील तर 
मोरपीस बनून येईल 
गालावर तुज्या हलकेच फिरून जाईल .

आठवण करशील तर 
गान बनून येईल 
ओठांवर तुझ्या सहज गुणगुणून जाईल .

विसरून जाशील तर
आठवण बनून येईल 
एकदा तरी डोळ्यात तुज्या 
अश्रू बनून येईल .

0 comments:

Post a Comment