November 28, 2020

प्रश्न ???


 प्रश्न ???


रात्रीच्या कडकडीत थंडीत
जेव्हा मी दुलईत मजेत
झोपलो असतो,
तेव्हा.......
तो निघाला असतो
लेकरांना सोडून काटेकुटे
साप, विंचू यांना तुडवत
जीवाची पर्वा न करता
लेकरांना चार दाणे मिळावेत
म्हणून रात्रीच्या भयाण
काळोखात शेतात पाणी शेंदायला

मनात असंख्य प्रश्नांचे
काहूर माजले असते
सावकाराचे कर्ज,
बायकोच गहाण ठेवलेले मंगळसूत्र
पोरांच्या शाळेची फीचे पैसे
सणासुदीचा पाहुणचार
बुढ्याचा औषधाचा खर्च
पोरीचं पिवळं हात उरकायची चिंता

आणि कधी सुखाने लेकबाळासोबत
झोपयला भेटेल हा सर्वात मोठा प्रश्न

त्याच्या आयुष्यात नेहमी प्रश्न असतात
उत्तर कदाचित मिळतात
आणि उत्तर मिळतात ते
मोटर पंप च्या विजेच्या शॉकने
गळफास घेऊन लटकलेल्या देहाने
नाहीतर विष पिऊन
निपचित झालेल्या शरीराने
त्याच्या प्रश्नाला मोठे अधिवेशन होतात
मोठमोठे नेते त्याच्या प्रश्नावर बनतात
मायबाप सरकार त्याच्याच
प्रश्नावर चालू असते.......

सर्वांना उत्तर भेटले असते
फक्त त्याला सोडून.....

नितीन ना मालोदे