" स्वप्न आणि अस्तित्व "
ओठांवर मस्त शीळ वाजवत आणि केस पुसतच बाथरूम मधून बाहेर पडलेल्या नितीन ची नजर किचन पोळ्या लाटत असलेल्या भाग्यश्री वर पडली . केसांची बट सांभाळत पोळ्या करण्यातच ती गुंग होती . तीच ते रूप पाहून तो मनातच हसला . हळूच चोर पावलानी तिच्या मागे तो उभा राहिला . दोन्ही हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा घालत , त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवले. त्याच्या स्पर्स्याने आणि सुगंधाने क्षणभर तीही शहारली .
थोड्या मंत्रमुग्ध वेळाने हसून ती मोठ्या लडिवाळपणे म्हणाली " आज ऑफिस नाही काय ?" तसा तो तिला आणखीनच बिलगला आणि हळूच म्हणाला " आज इच्छा नाही . I love you. " ती मनातच हसली, पुन्हा क्षणभर सुखावली . " हो का? " तसा तोही म्हणाला " हो !" .
आता मात्र ती लगेच सावरली " देवू का ठेवून एक !" हातातलं बेलन वर करत आणि त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवत ती ओरडली . तसा तो थोडा मागे सरला, तीच ते नाटकीय रूप पाहून मान तिरकस करून तिच्या डोळ्यांत पाहू लागला . तिचे ते टपोरे डोळे त्याला खूपच आवडायचे.
आता मात्र त्याचा इरादा ओळखून ती पुन्हा ओरडली " आता जातेस की ? ". पण आज मात्र तो ऐकण्याच्या मुडमध्ये न्व्ताच . तिच्या कडे तिरकस पाहत तो पुन्हा हसला . तसी ती आणखीनच मागे सरली . तो आता एक पाऊल पुढे टाकणारच , तोच त्याच्या खांद्यावर एक हात पडला ..........................." नितीन..... ! चल आता . खूप झाल . त्याच्या मित्रांनी त्याला आग्रह केला . तसा तो त्यांच्या कडे पाहून हसला . पहिले तो हसायचा तर वातावरण मंत्रमुग्ध करायचा . पण आता त्याच ते हसण जीव घेणार वाटायचं . पण नितीन हसून म्हणाला " बस पेग आणखीन यार ! बस एक पेग " . बारच्या त्या खुर्चीत तो आणखीनच लोळवला आणि आपल्याच धुंदीत म्हणाला .....
"बस एक लम्हा फिरसे जी ले .
नाव डूबनेसे पहले किनारा देख ले !
बस एक लम्हा फिरसे जी ले !
....................................................................................................................................................................
एकाकी सुनसान रस्ता , काळाकुट अंधार आणि त्या रस्त्यावरून घामाने चिंब भिजलेली
भाग्यश्री पळत सुटली सेरावैरा
. कुणीतरी तिच्या मागे धावतेय . भयाण शांतते शिवाय त्या रस्त्यावर चीठ पाखरु हि तिला दिसत नाही आहे . ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतेय तस तिला जाणवतेय , तो आणखीनच जवळ येतोय . ती प्रचंड थकली पण सार बळ लावून पळत आहे. " कोण तो ? ". का मागे लागला आहे ?. त्याचा चेहरा अस्पट दिसतोय पण ओळखीचा वाटतोय .
आता ती थकली , घामाने चिंब भिजलीय . शरिरात ताकदच उरली नाही . आता तो कुठल्याही क्षणी आपल्याला गाठणार या विचाराने ती घाबरली . शेवटचा प्रयत्न , तिने पुन्हा ताकद एकवटली , पायात बळ आणलाय आणि पळणारच त्यापूर्वीच त्याचा हात तिच्या खांद्यावर पडला .मागे वळून न पाहताच ती जीव तोडून ओरडली " नितीन .......नितीन ....नितीन "
घामाघूम झालेल्या आणि भेदरलेल्या भाग्यश्री ला जाणवलंय ती बेडवर उठून बसली आहे. तिने एकदा स्वतःला चाचपल . तिचा गळा सुकलाय , तहानेने
जीव व्याकुळ झालाय . तिने स्वतःला सावरत बाजूला नजर टाकली. नवरा आणि मुल शांत झोपली होती. तिच्या मनात एक भीतीची लहर येवून गेली , त्याला ओरडण्याचा आवाज तर गेला नाही ना ? .
ती हळूच उठली, किचन मध्ये आली . फ्रीज मधली थंड पाण्याची बाटली काढून तिने एक घोट घेतला . थोड पाणी अंगावरही सांडल तितकाच तिला गार वाटल .मग हॉल मध्ये येवून पंखा लावून जरा वेळ बसली .थोडा वेळ गेला, आता तिला बर वाटल .
लग्नापासूनच अस स्वप्न का पडत हेच तिला उमगत नव्हत . कोण तो मागे पाळणारा ? का लागलंय मागे ?. तिच्या मनात विचारांचे वादळ उठलय . तो , तो.. खूप जवळचा वातोय ? तिने आणखीनच जोर लावला स्वप्नाचा एक एक क्षण पुन्हा आठवला . तसी ती क्षणभर चमकली , हो कदाचित तो.?....तो ? ... तोच . ओठांवर त्याच नाव येताच ती प्रचंड शहारली . तो नितीन ....हो नितीनच ...
आता तिला गरगरायला लागल . तिला आठवल त्यांची शेवटची भेट .आठवल त्या भेटीत त्यांने एकच म्हटलेलं वाक्य ...
" शरीरापासून आत्मा कसा वेगळा करशील "
क्रमशः .....