August 3, 2013

अस प्रेम - बिमं करत नसत कुणी ..

आकाशातला चंद्र तसाच दिसतो

ना, जसा माझ्या गच्चीवरून 

तसाच तुज्याही त्या तुला मला आवडणाऱ्या
चंद ताऱ्यांची शप्पथ

आहे का ग प्रेम आपल ?


तू हसून डोळ्यात पाहत 
म्हणायची त्या चंद्रालाच विचार ना !
आज 'तो' पुन्हा तसाच कैक दिवसांनी 
माझ्या गचावर येवून पहुडला
मी म्हणालो " मित्रा असेल का रे तीच प्रेम माझ्यावर "
तो किंचित हसला
चंद्रिकेकडे पाहून म्हणाला
अस प्रेम - बिमं करत नसत कुणी 
.. अस प्रेम - बिमं करत नसत कुणी ..

पाच रुपयाची एक कॅडबरी

पाच रुपयाची एक कॅडबरी 
तू आणि मी .....

आपल्या नात्याला जवळ आणणारी 
पाच रुपयाची एक कॅडबरी 
तू आणि मी .....

कुछ नया करनेसे पहलेकुछ मिठा हो जाये 
अस त्यावेळी नव्हतं काही 
होत फक्त तूच माझ नात
आणि पाच रुपयाची एक कॅडबरी

मित्राच्या दुकानात इशारा करून
सहज ठेवून जाणारा

मी 
आणि 
नजर चुकवत अलगद उचलणारी 
तू 
पाच रुपयाची एक कॅडबरी

भेटीतून हळू हळू वाढत गेलेल नात

विणायला लागलेलं एक घरट
डोळ्यावर बसलेल एक स्वप्न 
परस्परांबद्दल वाढत गेलीली गोडी 
पण वाढली नाही  
पाच रुपयाची एक कॅडबरी

नंतर नंतर च्या भेटीत
तू हक्का ने मागायचीस
आणि मी हट्ट पुरवायचो
chocolate  तुला
आणि wrapper  मला

खूप जवळ आलो ,

मधात राहली ती
पाच रुपयाची एक कॅडबरी

आणि आज माझ्या जवळ
उरली फक्त wrapper.............


पाच रुपयाची एक कॅडबरी
तू आणि मी .....
सोड मित्रा जीवनाचे रडगाणे 
गा जरा आनंदाने जीवनगाणे 
होईल रे जरासा त्रास 
जरा थोडा वेळ थांब 

तोही काळ होता 
हा हि जाईलच रे 
काळच सर्व करेल रे ठीक 
तोच घालील रे तुज्या जन्खामावर फुंकर 
गा जरा आनंदाने जीवनगाणे...
माझ्याच पापाची कशी मी
भोगून राहलो सजा ,
जगता जगता घेऊन राहिलो
मरणाची मजा .................

जगाच्या व्यवहारात

जगाच्या व्यवहारात 
इतका स्वार्थी झालो 
की बसमध्ये एका वृद्धालाहि 
जागा द्याला भारी झालो .

पळापळी आणि पैश्याच्या हिशोबात 
मन कसे निष्ठूर झाले कळलेच नाही 
एक कोमल हृदयाचा मुलगा 
दगडात परिवर्तीत झाल्याच समजलच नाही ......
आठवणीत राहील सदा 
तुझा चेहरा 
रचशील डाव पुन्हा तू 
बदलून मोहरा ....

आठवणीचा पेटारा

आज आठवणीचा पेटारा उघडला 
काय काय सापडलं त्यात ..

सापडले प्रथम गुलाबाचं एक कोमजले फुल 
द्याचे राहिलेले जे तुला प्रथम भेठीत 

कुठून तरी पडला श्रावणाचा शिडकाव 
हळूच घेऊन गेला आठवणीच्या पावसात 
दाखवत राहिला चिंब पाऊस 
एक bike , तू आणि मी 

अचानक उडाल एक पण
सोनेरी वर्क लावलेले..
असेपर्यंत रे जिवंत प्रथम तुलाच
देयील अस काहीस लिहलेल

टचकन पडल एक आठवणीच अश्रू
वाट पाहत पाहत
कातरवेळी डोळ्यात दाटलेला ....

सरते शेवटी दिसल्या
निपचित पडलेल्या काही
शपथा आणि वचन
आता तरी दे रे गाडून
विनवणी करणाऱ्या ......