March 23, 2020

माझी अडाणी माय कधीच
नाही ठेवू द्याची दारात पाय
धुवून आल्याशिवाय हात पाय !
विचारायचो तर म्हणायची
अवदसा येते रे बाहेरची पायाबरोबर
हकलायचं असत तिला बाहेरच !
आम्हाला खूप हसू यायचं
म्हणायचो कुठली अवदसा कुठलं काय
अडाणीच ग तू माय !
आले कधी सरळ घरात मित्र
तर ओरडायची आधी धु हातपाय
मगच घरात घे म्हण्यायची !
खूप राग यायचा तिच्या अडाणी वागण्याचा
माय होती तो पर्यंत हि अडाणी प्रथा
सुरु होती घरात !
आज तूझी खूप आठवण येते
माय तू बरोबर होतीस
तुझी अडाणी प्रथाच
आज आम्ही मजबुरीने पाळत आहोत !!
नितीन मालोदे .....

March 21, 2020

सकाळी सकाळी अर्धवट झोपेतून 
उठून सूर्योदय पाहायला  जाण्यापेक्ष्या, 
मला आवडते तुझ्या सोबत रात्रभर शेकोटी भोवती
 गप्पा मारत,हलकेच कॉफी चे घोट घेत
 हळूहळू उमलत जाणार नातं आणि सूर्य दोन्ही अनुभवायला  !

नितीन मालोदे ......