October 8, 2020

 इथपर्यंत आलास ना आता
मग आता धीर सोडू नकोस
माघे वळू नकोस


उज्ज्वल आहे भविष्य
असा खचु नकोस
तूच आहेस उद्याचा शिल्पकार

आता असला काळोख सर्वत्र
तरी काहीच दिवसाचा अवधी
आणि सूर्यच असेल रे सोबतीला

मग आता धीर सोडू नकोस

नवीन दिशा नवे क्षितिज
नवी वाट नवे सोबती
घेऊन पुन्हा फक्त लड
उद्याचा सूर्य तूच आहेस