December 22, 2020

स्वर्ग

 ती खूप खुश होउन मिठीत यायची म्हणायची...........
यातच स्वर्ग आहे रे सारा ....
आता कधी भेटली तर म्हणते स्वर्ग जीवंतपनी कुणालाच भेटत नसतो
कुणालाच भेटत नसतो .....

" गरज "

 " गरज "
आपण खराब झाले म्हणून फेकून दिलेले अन्न दुसरा गरजवंत भुकेला मनुष्य कचऱ्यातून उचलून खातो हे दृस्य पाहने खूपच त्रासदायक असेल कधीच वाटलं नव्हतं .
एक ताटातील अर्ध अन्न गोड लागत नाही म्हूनन फेकून देतो तर दुसरा एक वेळची पोटाची आग कशीतरी मिटली पाहिजे म्हूनन तेच फेकलेला तुकडा गोड म्हूनन पोटात ढकलतो.
पोटाच्या भुकेसारखी दुसरी शाश्वत कुठलीही गोस्ट जगात नसेल. एकीकडे एका कडे इतकं प्रचंड प्रमाणात खायला मिळते तर दुसरीकडे एक वेळच्या अन्न ची भ्रांत.
दोन वर्ष्या पासून साठवून ठेवलेले धान्य खराब झाले म्हूनन मी फेकायला पोत्यात भरून ठेवत होत, तर तितक्यात आमच्याच अपार्टमेंट मध्ये कुण्यातरी फ्लॅट मध्ये काम करणारी एक मोलकरीण बाई बऱ्याच वेळ पासून ते पाहत होती. मला म्हणाली साहब क्या कर रहे हो , मी म्हणालो कुछ नही बाई " चावलं खराब हो गये तो फेकने जा रहा हुन.सड रहे है सब. साहब सही मै फेक रहे हो ?? मी म्हणालो हां बाई
ती कामवाली बाई अत्यंत आर्जवी स्वरात म्हणाली " साहब ये अनाज फेकिये मत मै घर लेके जाऊगी "।
मी म्हणालो बाई खराब हो गये है ,कुछ काम के नही। ती धान्यावर नजर फिरवत म्हणाली साहेब आपके काम के नही पर हमारे काम के है । हमारे परिवार मी आठ लोग है . महामारी कारण सब घर पे बैठे है कहीसे एकभि पैसे नाही आ राहा है साहेब , उपर से यांहाके सब लोगोने मुझे भी महामारी के कारण काम पे आनेसे मना कर दिया .आप हि बतावो साहब कैसे पेट भरेंगे परिवार का ???
साहेब कुछ भी करियेगा पार ये अनाज मत फेकियेगा इससे हमारा कुछ दिन कट जायेगा साहब । इसे मत फेकियेगा साहब । मत फेकियेगा।
आणि कुणीतरी कानात गरम गरम शिसे ओतल्यासारखं मी ऐकत स्तब्द उभा होतो, अगदी निस्तब्ध .
नितीन ना. मालोदे

lockdown

 Quarantine करून घे
तुझ्या मिठीत मला आणि
आजन्म दे lockdown
घोषित करून

महक

 

पहले कभी कबार मै
थोडासा महक जाता था तो
तुम पास भी नही आने देती थी
तुम्हारी महक सही नही जाती
कहके नाक मुरड लेती थी
अब तीन महिनेसे मै महका नही
और ये बीबी रोज न जाणे तुम
कितनी बार वही महक सुंग लेती हो ..

 








वेदनेतलं सौन्दर्य जपलं
आहे मी
म्हणूनच सदा हसत
असतो मी.

सावली

 तूच बोलायची तुझी सावली
होऊन राहीन सदा
इतकं प्रेम करील..
पुढचं काही बोलली असशीलच
पण मला आठवत नाही
आठवत इतकंच की
आजही उन्हात माझी
सावली हरवून जाते ते
 


आजचा हा चंद्र खुळा
कुणाला ग करील वेडा .
तुझ्यावर नजर त्याची
सांभाळून रहा ग पोरी ।।

 



स्पर्श होताच माझा
तु लाजाळू पेक्षाही
जास्त लाजलीस आणि
जवळ येताच आपण
तू अशी बहरलिस
जनु रातराणी
दिवसाच फुलून आली
 कल रात युही बैठा था
हमेशा की तरह
जाने कब तेरी याद आ गई और पुरी रात खाबो मे बीती
सबेरे होश आया तो देखा
व्हिस्कीचा ग्लास वैसा
ही भरा था
तेरे आखो से भी जादा
भला कोई नशीली चीज
हो सकती है ??

चंदन परीस

 

सुटला जेव्हा हाता
मधून हात तुझा

त्या हाताला परत
चंदन परीस झालाच नाही

नेमक काय

 नेमक काय

खूप काही असत मनात ,
ते आणायचं असत लिखाणात
कागदावर उतरवण्यासाठी
नेमक काय लागत तेच कळेनासे झाले ..
कुठेतरी काहीतरी अडकल ???

 





एकदा मला माझ्या शरीरातून बाहेर येऊन
स्वतशीश बोलायचं आहे !
दुसऱ्यांना खूप समजून घेतलं
आता स्वतःला समजायचं आहे !!
परकीयांची खूप मने जिकली
आता स्वतःच मन जिंकायचं
आता थोडं थांबायचं आहे जगापासून
मला एकदा माझ्याशीच बोलायचं आहे

 



ये बाबा करोना आता
तुझी गळाभेट घ्यावीच लागेल
किती काळ मी दूर राहील
किती काळ तु दूर राहशील
आता तुझ्यासोबत मित्र
म्हणून जगायचं ,
शत्रू म्हणून नाही
तू धावत आहेस मागे
आणि मी पळत आहे समोर
पळून पळून आता
मीही थकलोय रे बाबा
ये बाबा करोना आता
गळाभेट घेऊ

 


कधी कधी त्यांच्या माझ्या
नात्याला काही नाव नसत
पण तरही ते जपायच असत.....
मनाच्या अंतरात खोल रुजवायच असत ..

 



प्राक्तानाने रेखाटले काय
हे त्यालाच ठाऊक ?
मी लढणार
त्याला मात देण्यासाठी ...

 



कधीकधी आजही माझी पावले
नकळत वळतात त्या आड वाटेवरती
कितीही जखडून ठेवले तरी आपसूकच खेचली जातात

आणि मग वाटेवरच्या सार्या पाऊलखुणा
एक एक करत जागृत होतात

 




आज अनुभवतो ते
तुझे माझे क्षण
तू ठेवून गेलीस जे
जगण्याचे चार दोन क्षण

 
आयुष्य आता पूर्वी सारखी निर्मळ आणि मजेशीर राहिलं नाही. सर्व कसं नाटकीय झालाय .आधी आपण खळखळून हसायचो,आता हसतो ते फक्त फोटो काढण्यासाठी आहे तेही मोबाईल कडे पाहून. आधी आनंद आपण भरभरून घ्यायचो आता आनंद ही मोबाईलचा कॅमेरा कडे पाहून येतो. एकमेकांच्या सहवासात असतो पण एकमेकाकडे बघत सुद्धा नाही सतत लक्ष मोबाईलचे कॅमेरा कडे असतो. निरागस निर्मल पना सारेकाही विसरलो

 
खूप जपून ठेवला होता एक क्षण अगदी काळजाच्या कप्प्यात

अचानक कुठे हरवला
सापडतच नाही
तुझ्या प्रमाणे तोही
आता सापडतच नाही