शेवटी वर्ष संपल , नवीन सुरु झाल ..
काय मित्रा कस गेल वर्ष ??
काय ..मस्त मजेत ना ..
नवीन गाडी घेतलीस ..अच्छा घरपण पण झाल
राब राब राब्लास promotion पण झाल नौकरीत .
आणखी वरच्या step ला जायचं ...सार मजेत ...
काय रे पण गेल्या वर्ष्यात
कधी कुणी तुज्यामुळे आनंद झाला काय ?
कुणाच्या चेहराय्वर तुज्यामुळे हसू फुलल काय ?
कधी मस्त धुंद त्या मातीचा गंध घेतलास ?
चार निवांत क्षण एकता बसलास..??
आई बाबांना शी कधी मधी चार गोष्टी केल्यास ??
अचानक कुठल्या जुन्या मित्रांना phone लावून गप्पा मारल्यास ..
कधी रात्री निवांत गच्चीवर बसून पौर्णिमेचा चंद्र पाह्लास का ?
पावसात चिंब चिंब भिज्लास ??
अचानक कुठल्या नातेवाईकांना भेट दिलीस ??
निदान स्वताशीस गप्पा मारल्यास काय ?
नितीन मालोदे ....