March 17, 2016

सवय

सवय
आठवत तुला , एकदा मी सायंकाळी मी माझ्या मित्राच्या दुकानात उभा होतो. तू त्याच रस्त्याने नेहमीसारखी घरी जात होतीस. सहज तुझी नजरानजर झाली. तू समोर जाऊन गाडी वळवलीस, दुकानात आलीस . एक दोन जुजबी वस्तू निरखत कुणाचही लक्ष्य नाही हे पाहत म्हणालीस ‘ मंदिरात भेटतोस ? आता ! मी नजरेनेच हो म्हंटल. तू निघून गेलीस .
                                  तुज्यापाठोपाट मीही मंदिरात आलो. तू वाट बघतच होतीस. मी मनालो ‘ दर्शन करायचं ?’ तू हो म्हंटल. दर्शन करून परत पायर्यावर येवून बसलोत . त्या संद्याकाळच्या कातरवेळी बराच वेळ निशब्द गेल्यावर , मी विचारलं काय झाल ? आताच इतक्या अगतिकतेने बोलावलंस अस . तू थोडा वेळ काहीच बोलली नाहीस , रुमालीशी खेळत होतीस. जरावेळाने तू नजर वर करत तुझे टपोरे डोळे मजवर रोखीत म्हणालीस  “ सवय झाली रे तुझी."   

                              त्यानंतर ती कातरवेळ एकमेकांच्या डोळ्यातच पाहण्यात गेली ! शेवटच्या मंदिराच्या घंटानादने भानावर येवून बाहेर पडलो . आणि त्यानंतरची ३ - ४ वर्ष एकमेकांच्या सवयीतच आयुष्य गेले. कधी गप्पात, कधी भांडणात ,कधी सुर्यास्तात तर कधी अभ्यासाच्या निमित्ताने अगदी पहाटवेळी .कधी कधी गम्तीत मी तुला विचारायचो “ सवय तुटेल ना ? तू  “ कदाचित श्वास तुटेल पण सवय तुटणार नाही "  
                                        
                              आज १०-१२ वर्षानी  तुला पाहिलं. अजूनही तशीच ! पण अनोळखी तुज्यासाठी मी . कधीही न पाहल्यासारख , गर्दीतले दो जीव .
                              असो  , तुला एक विचारयच फक्त . ऐक सांगशील का ? सवय कशी तोडलीस सांगशील का ? कशी जगायला शिकलीस सांगशील का ? कारण मी सारे प्रयत्न करूनही माझी सवय तुटत नाही आहे. मी तुटत चाललो पण सवय सवय तुटत नाही आहे , ती वादातच जात आहे.
                        फक्त एकदा येवून सांग हि सवय कशी तुटेल ?
                                                                   अपूर्ण .