August 18, 2012

आठवतय



  आठवतय ...
                     त्या सकाळच्या मखमली थंडीत ,
                    तुझ माझ आईस्क्रीम खाण .
  आणि....
                    नदीच्या त्या विस्तीर्ण  पात्रात ,
                    दोघांचच आंधळी कोथींबीर खेळण .


आठवतय ...
                    काळजी नाही रे  तुला  माझी म्हणत ,
                    वाट पाह्ण्यावरून तुझ भांडण .
आणि....
                    ओसरल्यावर राग तुझा ,
                     मिठीत येऊन SORRY म्हणन .

  आठवतय ...
                    सहज मला एक जखम झाली होती 
                    समजल्यावर तुला
                     तू  नाही नाही ते बोलली होतीस 
  आणि....
                  मग जखमेवर त्या
                  बसली होतीस फुंकर मारत
                  अगदी मोरपिसाप्रमाणे .......

आठवत ........


July 26, 2012

जा देयून काही क्षण सुखाचे
न विसरता येण्याजोगे
नसेल जमत सुखाचे
देऊन जा काही  क्षण दुखाचे
न विसरता येण्याजोगे

येशील का कधीतरी पुन्हा पाह्यला
आहे मी जगत कोणत्या   क्षणात ......

March 31, 2012

अखेर तो चालला


अखेर तो चालला 

आपल्यामागे कैक प्रश्न अन्नुतरीत ठेवून
तो निघला स्वतच्याच प्रश्नाला शोधात .

चांगला होता रे अस कुणी म्हणेल
बर झाल गेला तो अशी कुणी म्हणेल
घरच्यांना तो समजलाच नाही असे हि कुणी म्हणेल

मित्र आठवण काढतील परोपकाराची
आप्त दुख कडत बसतील काही दिवस
कुणी तरी रडत बसेल त्याच्या आठवणीत

पण तो चालला त्या दिघांत्याच्या प्रवासाला ...
अखेर तो चालला ....

March 28, 2012

माझ्या शिवाय कशी


जगायला शिकलीस सांगशील का ?

नाही तूच म्हणाली होतीस ना

सवय झाली रे तुझी ....

नितीन ........







हि कातरवेळ आज संपता संपेना
माझ्यातून तू जाता जाईना.


कसे ते किनारे मिळाले होते कळेना
श्वासातला श्वास कसे सोडवेना.

तुझ्यात मी आणि माझ्यात तू
राहिले होते काय रिते मलाच कळेना .


त्या एका सांजवेळी नाते सारे तोडलेस
क्षणात त्या घरट्याचे धागे सारे उस्वलेस.
तू निघता निघता म्हणालीश 

मला एक शेवटची आठवण देशील ?

तुझ्या  आवडत्या गाण्याची रेकॉर्ड तेवढी देशील 

फक्त एक गान टाकायला नको विसरूस 

"   ये तेरा घर ये मेरा घर..... "


मी आणि तू
तू आणि मी


माझ्यात तू आणि तुज्यात मी
मी आणि तू


तू आणि मी
जन्मभरीचे नाते क्षणात सारे संपले

आता फक्त

तू ....

मी ....


तू भेटायला यायची तेव्हा
सारे जग साखर झोपेत असायचे
मी विचारायचो इतक्या सकाळी का ??
तू मिठीत येवून म्हणायची
लागू नये ना द्रुष्ट आपल्या नात्याला कुण्याची !

































तू निघतांना मी तुला खूप 

अडवण्याचा प्रयत्न केला

 
पण.. पण तू खुपच हट्टी निघालीस

 
अगदी भेटायला हट्ट धरयाचीच तस्सीच

 
तू नेहमीच जिंकत गेलीस आणि 


तुझ घर बांधण्यासाठी मी नेहमीच 

हरत गेलो ..............