मी भिजतोय पावसात चिंब , ओलाचिंब . माझ्या घराच्या छतावर .
तो बरसतोय सारखा मुसळधार , अनाहूतपणे .
मी ही साचलेल्या पाण्यात मस्त लोळून त्याला आव्हान देतोय .....बरस रे ! बरस ! .....
तसा तो आणखीनच पेटतोय , बरसतोय धुवांधार .....
मी डोळ्यांच्या पापनी वरून ओघळणाऱ्या थेम्भातून पाहतोय .
तो बरसतोय . त्या काळ्याकुट अंधारात फक्त तो आणि मी .
मी हसतोय , त्याला बोट दाखवून मी सांगतोय " एके दिवशी मी सुद्धा तिथे येऊन तुला सोबत करणार आहे , तुज्यासारखा मी ही कुणावर तरी बरसणार आहे , अंगाखांद्यावर खेळणार आहे ".
सांग मित्रा कधी बोलवातोस ? सांग रे ! ................
तो फक्त हसतोय , आणखीनच हसतोय ..........................

0 comments:
Post a Comment