March 15, 2021

काय उरते शेवटी ??

 काय उरते शेवटी ??

एक दिवस मला सर्दी ,खोकला होईल , ताप येईल दवाखान्यात नेण्यात येईल . मला करोना झाला असं कळवण्यात येईल. अवघ्या काही तासात नाहीतर दिवसात माझा मृत्यू होईल. आता माझं नाव " नितीन " वरन "dead body" असं करण्यात येईल. मला सरळ शमशानघाटात नेण्यात येईल आनि अवघ्या काही तासातच माझी राख होऊन जाईल. नंतर हीच राख नदीत सोडून दिली जाईल.तांबा खाली होऊन जाईल. शेवटी काय उरते ??
एक दोन दिवस माझ्या बद्दल काही उणेपुरे लोक शोक करतील. कुणी म्हणतील चांगला होता तर कुणी म्हणतील रस्त्यातील काटा गेला .social media वर भावपूर्ण श्रदांजली ची message फिरत राहतील . माझा फोटो फ्रेम मध्ये सजवून भिंतीला टांगण्यात येईल.त्यावर हार चढवण्यात येतील. हळूहळू अगदी नितीन ला सर्व विसरून जातील. तेरवी/चौदावीला आनंदाने गोड जेवण खातील. fast farword मद्ये सर्व आपल्या कामात गुंग होऊन जातील. काही माझ्या मिळकती साठी झगडे करतील. फोटो वर धूळ बसेल, हार सुकून जाईल. मी केलीली लोकांना मदद , सामाजिक कामे सर्वच मागे पडली जाईल आणि नितीन एक शून्य होऊन जाईल. मग शेवटी काय उरते ??
म्हणून आता जगून घ्यावा. आयुष्य वसूल करून घ्या. कुणासाठी कितीही केलं तरी कमीच मग आपण आपल्या साठीच जगायचं. मस्त आयुष्याची लूटमार करायची सुगंध दरवळू द्याचा सर्वीकडे.
lets enjoy only for your self
नितीन नारायणराव मालोदे

0 comments:

Post a Comment