February 16, 2021

रिस्क है तभी तो इस्क है

" रिस्क है तभी तो इस्क है " म्हणत आपल्या दमदार संवादाच्या आणि अभिनयाच्या जोरावर  " scam 1992 - the harshad mehta story " हि websiries जागतिक top 15 मध्ये दाखल झाली . " मैं हिस्ट्री बनाना चाहता हूं और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती" या सारखे सवांद मनाचा ठाव घेतात .  ८० आणि ९० च्या दशकात स्टॉक मार्केटला हादरवून टाकणारी सत्य घटनेवर आधारित हि  कहाणी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रत्येकानी पाहावी. खास करून मराठी माणसाने आवर्जून पाहावी.

                          share market त्यातील विश्व् , थक्क करणारे आकडे. अत्यंत गरीब परिस्थितील एक गुजराती तरुण पण तल्लख डोकं  आणि प्रचंड अभ्यास आणि शून्यातून विश्व् निर्माण करण्याची प्रचंड इच्छशक्ती च्या जोरावर share market चा अमिताभ कसा होतो हा रोमांचक प्रवास  खरंच पाहण्यासारखा आहे.  शेअर बाजार ही एक खोल विहीर आणि या विहिरीत डुबकी मारून प्रचंड पैसे उभारले जाऊ शकतात फक्त धोखा पत्करता आले पाहिजे हि शिकवण हि webseries करून देते . जिथे आपण ढोर कष्ट करून जेमतेम पैसे कमवतो तिथे हे गुजराती , मारवाडी , सिंधी लोक हे फक्त तल्लक डोकं आणि धोका पत्करायचा वृत्तीमुळे अल्पावधीत करोडो रुपये कमवतात. प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच हि webseries पाहावी आणि याही क्षेत्रात अभ्यास करून विहिरीत उडी मारावी .


नितीन नारायणराव मालोदे

9960543438
Civil engineer & Architectural consultant



0 comments:

Post a Comment