#लहानपण देगा देवा#
लहानपण हे खरच हे अदभूत रसायन आहे. यात असते ती फक्त निरागसता. लाभ , लोभ, द्वेष, मत्सर असं काहीच त्यात नसते असते ती फक्त निरागसता.
आमचं हि लहानपण असच गेलं खेळणं , बागडणं, उंडणं ,फुलपाखरू पकडणे , क्रिकेट खेळणे . आजच्या पिढीसारखं ओझं पाठीवर नव्हते. लहानपणी सर्वच खोडकर असतात पण त्या खोडित कुणाला त्रास द्याचा हेतू नसतो. असाच आमचा लहानपणचा एक खोडकर किस्सा .
आमची शाळा बारा वाजता असायची पण आम्ही ११ वाजता पासूनच शाळेजवळच्या मैदानावर धुडगूस घालत असायचो. नाहीतर गप्पा मारत चौकात पडलेल्या पाइपवर बसलो असायचो. मी , सोपान , सचिन , राजेश अशी आमची मित्रमंडळी जमलेली असायची.
त्याकाळी एखाद्या घराचा पत्ता शोधून काढणे फार अवघड काम असायचं. नवीन वसत असलेली वस्ती आणि त्याला पडलेलं घरक्रमांक आणि याच घरक्रमांक वरून पत्ता मिळायचा. घर क्रमांक माहित नसला कि पत्त्ता शोडायला फार अडचण.
असच एकदा आम्ही आमच्या ठिय्या वर जमलो होतो. गप्पांचा फड सुरु होता. अश्यातच एक काका कुणाचा तरी पत्ता शोधत नेमके आमच्या ठिय्या जवळ आले .
काका :" मुलांनो प्लॉट नंबर ५० माहिती आहे का ??
आम्ही : हो काका
काका : सांगा पाहू मग कुठे पडेल ते प्लॉट नंबर ५० ??
आमच्यात सोपान फार मस्तीखोर तो म्हणाला " काका एक मिनिट सांगतो " म्हणत डोकं खाजवायला लागला " माहित आहे हो काका पण आता आठवत नाही , थोडं थांबा म्हणत सर्व सल्ला मसलत करू लागले .
काका पत्ता भेटेल या आशेवर थांबले .
सोपाण " काका आठवलं प्लॉट नो ५० कुठे आहे ते !
काका : सांगा पाहू
सोपाण " काका आठवलं, आठवलं प्लॉट नो ५० हा , प्लॉट नो ४९ च्या बाजूला आहे "
काकानी अच्छा म्हणत मान वळवली आणि अचानक शतब्ध झाले. वळलेली पाउले थांबली. काकांनी एक तिरपा कटाक्ष फेकला आणि हरमखोरोनो म्हणत पुढे पाउल ठाकले.
तसाच सचिन ओरडला " काका काका" थांबा मी सांगतो खर
काका परत थांबले सचिन दुरूनच म्हणला " काका हे सर्व खोटारडे आहेत , प्लॉट नो ५० हा, प्लॉट नो ५१ च्या बाजूला आहे "
आणि काका कडे न पाहता आम्ही दफतर घेऊन धूम ठोकली
0 comments:
Post a Comment