इथपर्यंत आलास ना आता
मग आता धीर सोडू नकोस
माघे वळू नकोस
उज्ज्वल आहे भविष्य
असा खचु नकोस
तूच आहेस उद्याचा शिल्पकार
आता असला काळोख सर्वत्रतरी काहीच दिवसाचा अवधी
आणि सूर्यच असेल रे सोबतीला
मग आता धीर सोडू नकोस
नवीन दिशा नवे क्षितिज
नवी वाट नवे सोबती
घेऊन पुन्हा फक्त लड
उद्याचा सूर्य तूच आहेस

0 comments:
Post a Comment