पाळलेली कबुतरे
आज माझ्या मनाच्या वेदना कुणाला सांगू ? कशा सांगू ? पायाला विंचू चावला
असतानाही नर्तिकेने डोलदार नृत्य करीत राहावे ना ! तसे मला वरवर हसावे लागत आहे
.माझ्या मनात बाग फुलली आहे ,असे त्यांना वाटत असेल पण तिथे तर वणवा पेटला आहे पण
जसा वणवा कसा लागतो हे कुणालाच कळत नाही, मनातले वणवेही असेच असतात . आभाळाला
चाटून जाणार्या त्यांच्या जीभा पाहून मग आपले डोळे उघडतात . त्यातून मग अश्रू वाहू
लागतात, पण वणवा पावसाने भिजतो अश्रुनी नाही .
प्रेम करणे म्हणजे फुलांनी खेळते आहे असे मला
वाटत होते . ती फुले रातराणीची नसली तरी गुलाबाची असतील एखाद्या वेळी गुलाबाचे
काटे लागून रक्त येईल यापलीकडे माझी कल्पना कधीच गेली नाही . आज मला कळतय प्रेम
करणे म्हणजे विस्तवाशी खेळणे. कवडा नसलेल्या गच्चीवरून एखादे लहान मुल खाली पडताना
दिसावे नि आपल्याला काहीच करता येऊ नये असे माझ्या प्रेमाचे झालेय .
तू मला भेटलास एका क्षणिक काळापुरता.
जेमतेम पंधरा दिवसाचा काळ. प्रशिक्षणाचा प्रत्येक कामात तू घेतलेला उत्साहाचा
सहभाग , तुझे ते गोड गाणे . आपल्यापेस्या वयाने मोठ्या व्यक्तींना चर्चेचा कोणताही
मुद्दा पटविणे . नम्रतेने आपल्या जेस्ट्य सहकार्यांचा तेवलेला मान .
अधिकार्यांपासून ते प्रशिकापर्यंत सर्वांचा तू लाडका न झालाच तर नवल . मला आठवत रे
ते सगळे . ज्या क्षणानी मला तुझ्याकडे
खेचले .
मी तुझ्या प्रेमात पडली ! हो ! समजत होते तुला ते पण ? तू कधी जवळ येण्याचा प्रयत्न तर नाहीच किंतु
पाहणे सुधा टाळत होतास . तेव्हाच मी समजायला हवे होते रे ! पण थंडीच्या दिवसात
धुक्यामुळे दूरचा रुक्ष प्रदेश आपल्याला अंधुक दिसतो नि रम्य वाटतो , नाही का !
आयुषय हि असेच आहे . तरुण मनात उत्पन्न होणारे निराकार उन्मादक म्हणजे प्रेम ! कवी
त्यांची तुलना चांदण्याशी करतील पण मला वाटते
ते धुक्यासारखे असते . त्यांच्यामुळे भोवतालचे सारे सारे जगच निराळे भासू
लागते माणसाला .
प्रवाहाबरोबर होडी
वाहत जाते ना ! तशी मी तुज्या बरोबर ओढली जात होते . चर्चेच्या वेळी एकाच गटात
आल्यावर तुझा झालेला तो स्पर्श ! बंद असलेला रेडीओ एकदम सुरु करावा नि मधुर
संगीताचे सूर कानावर पडावेत तसा भास होई मला ! माझ्या मनाची हि घालमेल तुला समजत
होती कि नाही हे मला माहित नाही पण माझे
मन सर्वस्वी तुलाच मानत होते . पण आज माझे मन सांगते प्रीतीच्या त्या पहिल्या
चोकातच मी सांभाळायला हवे होते रे ! प्रशिक्स्यानाचे ते क्षण संपले . समारोपाच्या दिवशी
तरी तू प्रेमाची कबुली देशील हीच आशा मला होती . पण तू ? विसरून जा ....! जणूकाही
याच नजरेच्या भाषेत सांगून गेलास !
खूप वाईट
वाटले रे ! त्या रात्री मी एकसारखी तळमळत होते .माझ्या मनात विचारांचे वादळ सुरु
झाले होते. एकदा वाटे यावे तुझ्याकडे आणि म्हणावे का रे ! का अस वागलास ? माझे
मलाच कोडे पडले ! मी प्रेम तरी का करावे ? कुणावर ? ज्याला कळूनही दूर लोटणारा !
डीवचलेल्या माझ्या मनाला एकाच प्रश्न सतावित होता . अस का ? मी मनाला एकसारखी बजावीत
होते रे . आता तुला विसरून जायचे . तुझा नि माझा संबध संपला . दोन पाखरे एका
झाडावर किलबिलली म्हणून काही त्यांची घरटे एक होत नाही . तुला विसरण्याचे माझे
सारे प्रयत्न पाण्यात लाकूड बुडवावे , क्षनभर ते खाली गेल्यासारखे वाटावे नि
दुसर्याच क्षनी त्याने डोके वर काढावे अगदी तसेच चालले होते माझे .
ड़िवचलेल्या माझ्या मनानेच तुला रडवले रे ! क्षणभर का
होईना , माझ्या मिठीत तू पडला , रडण्यासाठीच का असेना . माफ करा दोस्ता ! हो
मित्रच म्हणते मी तुला ! तुझ्या सहकार्यांना कळेल या बेताने मी तुला चिट्ठी लिहली
. मला ठाऊक होते रे , तुला चारित्र्यावर शिंतोडे आवडणार नाही . पण मनातला एकच
प्रश्न .....अस का ?
एका
पवित्र ,उंच ,निवांत स्थळी तू मला नाईलाजाने का असेना भेटायला बोलावलेस . एका पंख
तूटलेल्या प्रेमकहाणीची ती वाणी ऐकण्यासाठी.
सत्य ! सत्य
कधीच कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही ना ! वरून गारठलेल्या समुद्राच्या
बर्फाखालीही पाण्याचा गर्ता फेसाळत असतो . लांबून दिसणाऱ्या हिरवळीतही खड्डे असतात
ना ! खूप विचार केला मी तुझ्याबद्दल . मी तुझी अपेक्षाही नाही करत आता .
त्याक्षणीच प्रेमाची महती मला कळली .
मला तुझ्या
त्यागाचा अभिमान वाटतो . पण कधी ‘ साहस ‘ प्रितीच वैरी ठरत . तू मला म्हंटल होतेस
ना “ प्रेमासाठी प्रेमाचा त्याग “ केला म्हणून ! तुझ्या कोणत्या तरी कारणाने ( ते
मलाही बोलला नाहीस ) तिला अश्या पद्धतीने प्रेम मागितले की त्या क्षणी तिची कसोठी
लागावी . अरे, प्रेम दिल्याने वाढते , जवळ आल्याने वाढते . उमलणाऱ्या कळ्यासारखे
हळुवार फुलते . अबोल असलेली प्रितीही वर्षानुवर्ष टिकते ,एकमेकांशी न बोलतासुदधा
...हवा फक्त विश्वास ! प्रेम हेच खर तर खर साहसाची प्रेरना असते .
तिच्यावर
बेवफाईचा ठपका ठेवून तू झालास मोकळा . माफ कर ! खूप कडवट लिहते पण काय करू ? तुझ्याविषयी
सहानुभूतीच लिहून घेते. बेवफा ती नाही तू आहेस . मला माहित आहे , श्ब्दांच्या
पसाऱ्यात तूच वरचढ असशील पण त्या दिवशी नाही बोलले तुला . जरी तिच्या नावा
,पल्ल्याची मला माहिती सांगितली नाहीस तरी मला माहित आहे रे ! आणि तिच्या
चारित्र्यावरून एकच सांगते . चुकतोस फक्त तूच ! तुझा अहंकार ! तुझी टोकाची भूमिका
!
अरे प्रेम म्हणजे काय ? कादंबर्यातील ,
कल्पनातील अलंकारित अवास्तव नव्हे . प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त वास्तवात
एकमेकांना दिलेली साथ . ज्या प्रवाहात समाज , चारित्र्य ,भिंती ,श्रीमंत ,गरीब
सर्व वाहून जातात . माफ कर ! तुझ्याविषयी पूर्ण माहित नसतानाही मी हे लिहतेय पण
काय करू तुझ आयुष्यच अस शेवाळ आहे ज्यावर घसरून माणूस पडतेच .
मीही आता
जीवनाच्या नव्या दालनात प्रवेश करीत आहे . तिथे तुझ्या आठवणींचा अडगळ ठेवणे हा
वेडेपणा ठरेल . त्या साऱ्या आठवणी दूरदूर भिरकाऊ पाहतेय पण ? “
पाळलेली कबुतरे “ आभाळात कितीही उंच गेले तरी आपल्या जागी परत येतात ...त्या
आठवणीही तशाच घुमू लागतात .
त्याच वेळी मला
समजायला हवे होते रे ! देवाने माणसाच्या मनाला डोळे दिले असते तर ...! तर
तुझ्यासाठी अश्रू गाळीत बसण्याची पाळी मला आली नसती. मला तर दिसतोच आहे समोरचा फोटो
. प्रणय करीत असलेल्या कबुतराच्या जोडप्यातील
बाण लागून खाली पडलेला ‘ नर ‘ आणि त्या रक्ताळलेल्या नराला कवटाळून अश्रू गाळणारी
ती तरुणी ...!
0 comments:
Post a Comment