पाच रुपयाची एक कॅडबरी
तू आणि मी .....
आपल्या नात्याला जवळ आणणारी
पाच रुपयाची एक कॅडबरी
तू आणि मी .....
कुछ नया करनेसे पहलेकुछ मिठा हो जाये
अस त्यावेळी नव्हतं काही
होत फक्त तूच माझ नात
आणि पाच रुपयाची एक कॅडबरी
मित्राच्या दुकानात इशारा करून
सहज ठेवून जाणारा
मी
आणि
नजर चुकवत अलगद उचलणारी
तू
पाच रुपयाची एक कॅडबरी
भेटीतून हळू हळू वाढत गेलेल नात
विणायला लागलेलं एक घरट
डोळ्यावर बसलेल एक स्वप्न
परस्परांबद्दल वाढत गेलीली गोडी
पण वाढली नाही
पाच रुपयाची एक कॅडबरी
नंतर नंतर च्या भेटीत
तू हक्का ने मागायचीस
आणि मी हट्ट पुरवायचो
chocolate तुला
आणि wrapper मला
खूप जवळ आलो ,
मधात राहली ती
पाच रुपयाची एक कॅडबरी
आणि आज माझ्या जवळ
उरली फक्त wrapper.............
पाच रुपयाची एक कॅडबरी
तू आणि मी .....
0 comments:
Post a Comment